Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : हाथरस प्रकरणाच्या “एसआयटी” तील डीआयजीच्या पत्नीची आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

उत्तर प्रदेशातील बहुचर्चित आणि निंदनीय हाथरस प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. पुष्पा देवी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. उन्नाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे डीआयजी चंद्र प्रकाश यांच्या त्या पत्नी होत्या.  शनिवारी लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी येथील घरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्र प्रकाश हे हाथरस येथील बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या एसआयटीमधील सदस्य आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा देवी यांचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घरात कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. या घटनेचा तपास सुरू आहे. चंद्र प्रकाश हे उन्नाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत. पत्नी पुष्पा प्रकाश यांच्यासह दोन मुली आणि एक मुलगा आहे. शनिवारी चंद्र प्रकाश हे कामानिमित्त घराबाहेर पडले होते. काही वेळानंतर पुष्पा यांनी त्यांना फोन केला. ‘मी जात आहे,’ असे त्यांनी चंद्र प्रकाश यांना सांगितले. त्यानंतर फोन ठेवून दिला.

Advertisements
Advertisements

पत्नीच्या फोननंतर डीआयजी चंद्र प्रकाश यांनी  त्यांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, फोन उचलला नाही. त्यांनी तात्काळ घरी धाव घेतली. घरी पोहोचल्यानंतर तळमजल्यावर मुले आणि नोकर होते. पत्नी पहिल्या मजल्यावरील खोलीत होती. त्यांनी दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी दरवाजा तोडला. आतमध्ये बघितले तर, पुष्पा देवी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!