MaharashraNewsUpdate : उद्यापासून सुरु होत आहेत महाराष्ट्रातील जिम , काळजी घ्या

महाराष्ट्रात उद्या दि . २५ पासून जिम उघडण्याची परवानगी मुंख्यामंत्री उद्धव ठाकरे सरकारनं अखेर दिली आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करून ही जिम सुरू कऱण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता व्यायाम करण्यासाठी जिमला जाता येणार आहे. राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्यामुळे २३ मार्च ते ३१ मे लॉकडाऊन होता. त्यानंतर अनलॉकच्या टप्प्यांमध्ये हळूहऴू अर्थव्यवस्थेची एक एक कडी खुली करून देण्यात आली. राज्यात आता २५ तारखेपासून जिम सुरू कऱण्याची परवानगी महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली आहे. SOS नुसार जिम सुरू होणार आहे. नागरिकांना जिममध्ये जाताना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन कऱणं अनिवार्य असेल. याशिवाय जिममध्ये थर्मल स्क्रिनिग आणि सॅनिटायझेशन अत्यावश्यक असेल. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पूर्ण काळजी घेऊन कंटेनमेंट झोन वगळता राज्यात जिम सुरू कऱण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे. जीम सुरू करावी अशी मागणी गेले काही दिवस होती याबाबत आता निर्णय झाला आहे.