MumbaiNewsUpdate : न्यायालयाच्या कठोर कारवाई नंतरही कंगनाची टिव टिव थांबेना …

बॉलिवूड स्टार सुशांतच्या मृत्यू प्रकरणानंतर स्टार्ट झालेल्या कंगनाला, मोदी सरकारने वाय प्लस सुरक्षा दिल्यानंतर काही केल्या तिचे टिव टिव थांबायला तयार नाही. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे तिच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला आहे . तरीही ती थांबायला तयार नाही . मोदी सरकारची मेहेर नजर असलेल्या कंगनाला कायद्याचीही धाक राहिलेला नाही. दरम्यान तिच्या आणखी एका ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने आक्षेपार्ह ट्वीटद्वारे न्यायव्यवस्थेचाही अवमान केला, असा आरोप करत अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
हिंदू व मुस्लिम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि समाजातील सौहार्दपूर्ण वातावरण व जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतूने सोशल मीडियावर वारंवार विधाने केल्याच्या आरोपांविषयी वांद्रे पोलिसांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वीच कंगना व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या १२४-अ (देशद्रोह) या कलमाबरोबरच १५३-अ (धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणे) व २९५-अ (धार्मिक भावनांना ठेच पोचवणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. ‘या एफआयआरनंतरही कंगनाने आणखी एक ट्वीट करून ‘पप्पू सेना’ वगैरे शब्द वापरून न्यायालयाचाही अवमान केला. त्यामुळे तिला न्यायालयाचाही आदर नाही’, असा आरोप अली यांनी तक्रारीत केला आहे.