AurangabadCoronaUpdate : दिवसभरात आढळले 157 नवे रुग्ण, एक मृत्यू , जिल्ह्यात 34289 कोरोनामुक्त, 1670 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 288 जणांना (मनपा 205, ग्रामीण 83) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 34289 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 157 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37002 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1043 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1670 रुग्णांवर उपचारसुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 63 आणि ग्रामीण भागात 14 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (47)
एन नऊ (2), घाटी परिसर (1), काल्डा कॉर्नर (2), उल्कानगरी(1), खडकेश्वर (1), विष्णू नगर (1), मयूरपार्क (1), टी व्ही सेंटर (1), शहानूर वाडी (1), एन तीन सिडको (1), राजाबाजार (1), मधुबन सिडको (1), नारेगाव (1), जय विश्वभारती कॉलनी (3), सेंट्रल नाका, बायजीपुरा (1), गुलमंडी (1), रामनगर सिडको (1), एन अकरा, हडको (1), सारंग सोसायटी (2),एन दोन सिडको (1), राम नगर एन दोन सिडको (1), नारळी बाग (3), शिवाजी नगर (2), जय भवानी नगर सिडको एन चार (1), मयुरबन कॉलनी हिमायत बाग बसस्टॉप जवळ (1), औरंगपुरा (1), नवनाथ नगर (1), पदमपुरा (1), पैठण गेट परिसर (1), सिडको (1), एन सहा सिंहगड कॉलनी (2), जाधववाडी पिसादेवी (2), पारदेश्वर मंदिर परिसर (1), टाऊन सेंटर सिडको (1), सुपारी हनुमान रोड परिसर (1), गवळीपुरा (1), एन चार सिडको (1)
ग्रामीण (47)
खुलताबाद (1), पैठण (4), वरझडी (1), पडेगाव (1),नाचनवेल(1), मढी कन्नड (1), गेवराई तांडा (1), दौलताबाद पोलिस स्टेशन परिसर (1), कानडगाव,कन्नड (1), महादेव मंदिर (1), माऊली नगर, सिडको महानगर (1), पवन नगर, रांजणगाव (1), सिडको महानगर (1), सारा सार्थक बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), ओयासिस चौक, वाळूज (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), समर्थ नगर, कन्नड (4), अन्य (2), सरस्वती कॉलनी (1), शेंद्रा (1), पाचपिंपळगल्ली (2), साळीवाडा (1), जखमतवाडी, गंगापूर (2), शांती नगर, रांजणगाव (1), भोकरगाव, वैजापूर (1) औरंगाबाद (1), फुलंब्री (8), गंगापूर (1), कन्नड (1)
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत कानडगाव, कन्नड येथील 66 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.