AurangabadCrimeUpdate : पैशाच्या व्यवहारातून अपहरण, दोघांना बेड्या

औरंगाबाद – संजयनगरातील तरुणाचे २ लाख रु.च्या व्यवहारातून अपहरण करुन आंबेडकरनगरातील गॅरेजमधे डांबून ठेवणार्या दोघांना जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शेख नय्यर शेख हुसेन रा.किराडपुरा,व खान मुजफ्फर अन्वरखान रा.करीम काॅलनी अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील दोघांनी संजयनगरातून मो.रियाज मो.रऊफ ने दोन लाख रु. आरोपींकडून लाॅकडाऊनपूर्वी घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघंड झाले. म्हणून नय्यर आणि मुजफ्फर ने रविवारी रात्री १२ च्या सुमारास मोहमद्द रियाज ला त्याच्या घरातून पळवत आंबेडकर नगरातील गॅरेजमधे ठेवले. पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या आदेशावरुन पीएसआय दत्ता शेळके आणि त्यांच्या पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने नय्यरच्या फोन चे लोकशन मिळवून पहाटे पाच वा. ताब्यात घेतले.वरील कारवाईत पोलिस कर्मचारी हारुण शेख, सुनिल जाधव, संजय गावंडे, संतोष बमनात यांनीही सहभाग घेतला होता.