Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MadhyapradeshNewsUpdate : विषारी दारू प्रश्न केल्यामुळे १४ जणांचा बळी , चार पोलीस निलंबित

Spread the love

विषारी दारूमुळे मध्‍यप्रदेशातील उज्जैन शहरात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याने भागात खळबळ उडाली आहे. सर्व मृतांच्या शरीरात विषारी घटक सापडल्याची माहिती उज्जैनच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.  सदरची घटना उघडकीस येताच खारा भागातील पोलीस ठाण्याच्या प्रभारींसह ४ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय अवैध दारूविरोधात कारवाईत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी  गुरुवारी  एसआयटीला चौकशीचे आदेश दिले आहेत. चौहान म्हणाले की, केवळ उज्जेनचं नाही तर संपूर्ण राज्यात अशा स्वरुपातील प्रकरणांवर लक्ष ठेवलं जाईल. जेथे कोठेही विषारी दारू तयार केली जात असल्याचा संशय येईल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर दुसरीकडे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी या घटनेवरुन भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना उज्जेन जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रुपेश द्विवेदी यांनी सांगितले की, बुधवार ते गुरुवारपर्यंत उज्जेनच्या तीन ठाणे हद्दीत खाराकुआ, जीवजीगंज ठाणे आणि महाकाल ठाण्यात विषारी द्रव्य प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. यापैकी अनेक भिकारी तर गरीब होते. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी भागात छापेमारी करण्यात आली, यामध्ये 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यामध्ये मुख्यत: जिंजर तयार करणारे सिंकदर, गबरु आणि युनूस यांचा समावेश आहे. हे लोक बेकायदेशीरपणे जिंजर (विषारी दारू) तयार करीत विक्री करीत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!