IndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला देशातील कोरोनास्थितीचा आढावा

Advertisements
Advertisements
Spread the love

देशातील कोरोनावरील संशोधन आणि लस निर्मितीच्या कामातील प्रगतीची समीक्षा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी वैज्ञानिकांच्या संशोधनाबरोबरच पारंपरिक उपचार पद्धतींच्या किती महत्वाचे आहे, यावर अधिक भर दिला.  यावेळी बोलताना त्यांनी देशात कोरोनाच्या चाचण्या आणि सीरो सर्व्हे आणखी वाढवण्यात यावे असे अवाहन केले. यावेळी बोलताना , देशातील सर्व नागरिकांसाठी तपासणीची सुविधा कमी किमतीत, नियमितपण आणि जलदगतीने उपलब्ध व्हायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले. माझे सरकार सर्वांसाठी कमी किमतीत लस उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून त्यांनी भारतीतील लस  निर्माण करणाऱ्या निर्मात्यांच्या प्रयत्नांची  प्रशंसा केली.

Advertisements

दरम्यान कोरोनाच्या या संकटकाळात आयुष मंत्रालयाने पुराव्यांवर आधारित संशोधन आणि विश्वसनीय परिणाम उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांची देखील पंतप्रधान मोदींनी प्रशंसा केली. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, नीती आयोगाचे सदस्य, प्रधान वैज्ञानिक सल्लागार, अनेक वरिष्ठ वैज्ञानिक आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते. देशात करोनाची लस निर्माण करण्यासाठी चांगले प्रयत्न होत असून या सर्व प्रयत्नांना सरकारची साथ असून या प्रयत्नांच्या पाठीशी सरकार कायम राहील असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. लस उपलब्ध झाल्यानंतर लस वितरणाची आरोग्य मंत्रालय काय तयारी करत आहे, याबाबतही पंतप्रधान मोदी यांनी माहिती घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशात लशीची उपलब्धता निर्माण करणे, मोठ्या प्रमाणावर लशीचा साठा करून ठेवण्याचे तंत्र विकसित करणे आणि लशीची योग्य वितरण व्यवस्था तयार करण्याच्या यंत्रणेवर काम करत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!