AurangabadNewsUpdate : दरोड्याच्या तयारीत असलेले दरोडेखोर पकडले, जिन्सी पोलिसांची कामगिरी

औरंगाबाद- दरोड्याच्या तयारीत असलेल्या पुणे, अहमदगरच्या टोळीस जिन्सी पोलीसांनी मोठ्या शिताफिने पाठलाग करून पकडले. स्टीलचा मोठा पाईप, लोखंडी रॉड, दोरी, एअर गन, मिर्ची पावडर त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केले आहे. या टोळीतील तिघांना पकडले असून दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून स्टीलचा मोठा पाईप, लोखंडी रॉड, दोरी, एअर गन, मिरची पावडर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. आज, 16 ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता 18 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके करित आहेत.
दि . १५ आॅक्टो रोजी 00.15 वाजेच्या सुमारास जिन्सी पोलीस ठाण्याचे एक पथक सावरकर चौक ते आझाद चौक अशी गस्त घालत होते. झेन कार संशयास्पद रित्या फिरत असल्याचे गस्तीवरील पोलिसांना निदर्शनास आले. त्यानंतर गस्तीवर असलेले कर्मचारी नजीर पठाण व पोलीस शिपाई संतोष वाघ यांनी शासकीय वाहनाने त्या गाडीचा पाठलाग सुरु केला. पाठलाग सुरु असताना संशयास्पद गाडीतील व्यक्तीने गाडी थांबवली व गाडीच्या बाहेर येवून पळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलीस कर्मचारी वाघ यांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तसेच पोलीस कर्मचारी नजीर पठाण व काकडे यांनी दोघांना गाडीमध्ये जागेवरच थांबवले. दरम्यान, दोघांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश सूर्यवंशी , दत्ता शेळके, सफौ नजीर पठाण, हेमंत सुपेकर, संतोश वाघ, काकडे, उस्मान शेख, वाघचौरे, संजय गावंडे, सुनील जाधव, संतोष बमनात यांनी हि कारवाई केली आहे .
दरम्यान सदर ठिकाणी पोउपनि दिनेश सुर्यवंशी व कर्मचारी तात्काळ जावून खात्री केली असता 1 ) सुनील अकुंश मळेकर (वय 24, रा दानेप जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. वेल्टा, जि. पुणे, ह.मु. आळंद फाटा, गैवते वस्ती, चाकण, ता. हवेली, जि पुणे), 2) शेख नशीर शेख बशीर (26, रा. करंजगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर), 3) शेख सलीम शेख बाबु (26, रा. खठकाळी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांच्या गाडीत एक स्टीलचा मोठा पाईप, लोखंडी रॉड, दोरी, एअर गन, मिर्च पावडर असे दरोडयासाठीचे साहित्य मिळून आले. तसेच 4 ) समीर शब्बीर शेख (रा. खटकाळी, ता. राहुरी, जि. अहमदनगर), 5) साहील शमसोद्दीन सय्यद (रा. पोखरी, जि. अहमदनगर) हे घटनास्थळावरून पळून गेले आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.