MaharashtraNewsUpdate : MPSC : मोठी बातमी : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षाही एमपीएससी ने पुढे ढकलल्या
Advertisements
Advertisements
राज्यात मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकललेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निर्णययावरून प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच राज्य लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या परीक्षाही रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
Advertisements
