CrimeNewsUpdate : माणसं नव्हेतच हि… शिक्षक पिता आणि प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या …

Advertisements
Advertisements
Spread the love

माणसांमध्ये पशुत्व आले कि काय ? असा प्रश्न निर्माण व्हावा असे गुन्हे सध्या घडत आहेत . मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून रक्ताच्या नात्याला हादरवून सोडणारी, नात्यांवरचा विश्वास उडवणारी ही घटना आहे. पोटच्या मुलीवर पित्याने आणि तिने ज्याच्यावर विश्वास टाकला, त्या प्रियकराने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सकाळी दोन्ही आरोपींना  ठोकल्या . पीडित मुलगी गर्भवती होती. पीडित मुलीचा पिता शाळेत शिक्षक आहे. तीन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथे पोलिसांना एक मृत भ्रूण सापडले. या प्रकरणाची चौकशी करताना, ते मृत भ्रूण पीडित मुलीचे असल्याचे समजले, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गुरव यांनी दिली. माझ्यावर वडिलांनी आणि प्रियकराने अनेकवेळा बलात्कार केला, त्यातून मी गर्भवती राहिले असे पीडित तरुणीने पोलील चौकशीत सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब आधी पनवेल येथे रहात होते. पीडित तरुणीची प्रियकराबरोबर पनवेलमध्ये असताना ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. ते वाशिंदला रहायला गेले. पण तिथेही मुलगी तिच्या प्रियकराला भेटतच होती असे पोलिसांनी सांगितले. पीडित तरुणीच्या जबानीवरुन तिचे वडिल आणि प्रियकर दोघांना पोलिसांनी अटक करुन, बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. तपासाचा पुढील भाग म्हणून दोन्ही आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!