Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangRapreCase : सीबीआयने गुन्हा दाखल करून केली तपासाला सुरुवात, पीडितेच्या कुटुंबीय आज लखनौच्या हाय कोर्टात

Spread the love


सीबीआयने अखेर हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या बरोबरच सीबीआयने या प्ररणात आपला तपासही सुरू केला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेनुसार सीबीआयने हा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने एका पथक गठीत केले असून, पथकाने आपला तपास सुरू केला आहे. या घटनेला २७ दिवस झाल्यानंतर दरम्यान आता सीबीआयने हाथरस प्रकरण आपल्या हातात घेतले आहे. या तपासाची सुरुवात प्रथम हाथरस पोलिसांनी सुरु केला होता त्यानंतर एसआयटी आणि आता सीबीआयने या प्रकरणात तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने हाथरस प्रकरणी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या पूर्वी पीडिचेच्या भावाने हाथरसच्या चंदपा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १४ सप्टेंबर २०२० रोजी आरोपीने आपल्या बहिणीला बाजरीच्या शेतात गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारदार भावाने केला होता. आतापर्यंत या प्रकरणाची तपास एसआयटी करत होती. १४ सप्टेंबरचे सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी एसआयटीने तपास सुरू केल्यानंतर एसआयटीच्या निशाण्यावर गावातील ४० लोक होते. गावातील या ४० लोकांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे. घटना घडली तेव्हा हे ४० लोक शेतांमध्ये काम करत होते. यांमध्ये आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे.
दरम्यान, उद्या, १२ ऑक्टोबरला अलाहाबाद हायकोर्टाच्या पीठासमोर हाथरस प्रकरणाची सुनावणी असल्याने पिडीतेचे कुटुंबीय लखनऊला जात आहेत. कडक सुरक्षेत उत्तर प्रदेश पोलिस उद्या पीडित कुटुंबीयांना लखनऊला घेऊन जातील. यासाठी पीडित कुटुंबातील ५ लोक आणि काही नातेवाईक लखनऊला रवाना होतील. या सर्व पार्शवभूमीवर उत्तर प्रदेशचे पोलिस उपमहानिरीक्षक शलभ माथुर यांनी गावात जाऊन तयारीचा आढावा देखील घेतला आहे. १ ऑक्टोबरला अलाहाबाद हायकोर्टाने या घटनेची दखल घेत उत्तर प्रदेशच्या गृह खात्याचे मुख्य सचिव अवनीश अवस्थी. पोलिस महासंचालक हितेशचंद्र अवस्थी, सहाय्यक पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांच्या व्यतिरिक्त हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार आणि पोलिस अधीक्षक राहिलेले विक्रांत वीर यांना देखील बोलावण्यात आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!