Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharElectionNewsUpdate : बिहार निवडणुका लढविण्यासाठी काँग्रेसचा ” संघ ” घोषित, शत्रुघ्न सिन्हा, तारिक अन्वर, मीरा कुमार , कीर्ती आझाद आदींचा समावेश

Spread the love

देशातील सर्वच राजकीय पक्षांना बिहार निवडणुकांचे वेध लागले आहेत. काँग्रेसनेही बिहार विधानसभा निवडणकीसाठी रविवारी अनेक समित्यांची घोषणा असून निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये राज्याचे स्थानिक नेते, तारिक अन्वर, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद आणि मीरा कुमार यांना देखील स्थान देण्यात आले आहे. तसेच, काँग्रेसचे सचिव आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांना निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बिहारमधील विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी ७० जागा काँग्रेस लढवत आहे. राज्यात तीन टप्प्यात २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. तर मतमोजणी १० नोव्हेंबरला होणार आहे.

या निर्णयाबाबत काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, मोहन प्रकाश यांची १४ सदस्यीय निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीचे संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समितीत मीरा कुमार, तारिक अन्वर, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद, शकील अहमद आणि संजय निरुपम अशा वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार समिती, मीडिया समन्वय समिती, जनसभा आणि लॉजिस्टिक समिती, कायदेविषयक समिती आणि कार्यलय व्यवस्थापन समितीला मंजुरी दिली आहे. या बरोबरच सुबोध कुमार यांना प्रचार समितीचे संयोजक बनवण्यात आले आहे, तर जे. मिश्रा यांची समितीच्या सह-संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा याना निवडणुकीसाठी मीडिया समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. तसेच प्रेमचंद मिश्रा, संयोजक आणि राजेश राठोड समितीचे सह-संयोजनक म्हणून काम पाहतील. बृजेशकुमार मुनन यांना सभा आणि लॉजिस्टिक समितीचे संयोजक, तर वरुण चोपडा यांना कायदेविषयक समितीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. पक्ष कार्यालय प्रबंधन समितीमध्ये अशोक कुमार आणि कौकह कादरीसह इतर नेत्यांचा समावेश असेल.

या आधी काँग्रेसने शनिवारी पक्षाच्या ३० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर यांच्यासह काही मुख्यमंत्र्यांची नावे देखील सामिल आहेत. काँग्रेस महाआघाडीअंतर्गत बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!