Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पंतप्रधान कायर आहेत , या सरकारकडून देशाला धक्का दिला जातोय त्यापेक्षा मला लागलेला धक्का मोठा नाही : राहुल गांधी

Spread the love

भारत-चीन सीमा वादावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी  मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधींनी हरियाणामध्ये बोलताना म्हटलं की, पंतप्रधान स्वत:ला देशभक्त म्हणवतात, हे कसले देशभक्त  ? पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं आहे. संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की ज्या देशात चीनचं सैन्य आलंआणि  भारताची जमीन हडप केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की भारताची कोणत्याही जमिनीवर चीनने कब्जा केलेला नाही. मात्र सगळ्या देशाला माहित आहे पंतप्रधान काय बोलले होते असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. १ हजार २०० चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली वरुन स्वतःला मोदी देशभक्त म्हणवतात. चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली. जगात भारत हा असा एकमेव देश आहे ज्यामध्ये चीनच्या सैन्यानं पाऊल ठेवलं आणि आपली १ हजार २०० चौरस किमी जमीन हडप केली. जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकलं असतं. चीनला १०० किमी मागे ढकललं असतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची ताकद, शेतकऱ्याची ताकद, मजुराची ताकद समजत नाही”

दरम्यान दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली . ते म्हणाले कि , लष्कराच्या कोणत्याही जवानांना अधिकाऱ्यांना विचारा ते सांगतील की मोदी हे आपली प्रतिमा जपण्यासाठी देशाशी खोटं बोलले. ते भारत मातेची गोष्ट करतात. त्यांनी भारतमातेचे १ हजार २०० चौरस किलोमीटर चीनला देऊन टाकले. माना किंवा नका मानू पण हे सत्य आहे. याबाबत मोदी काय बोलतात? असा सवालही त्यांनी  आज दुपारी केला होता.  कोरोनाच्या बाबतीतही भारताचे पंतप्रधान अपयशी ठरले आहेत. देशातील शेतकरी व मजूर कमकुवत झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची शक्ती ओळखत नाहीत. शेतकऱ्यांची शक्ती नाही ओळखत, कामगारांची शक्ती नाही ओळखत. त्यांना कृषीविषयकबिलांमुळे होणाऱ्या परिणामांची भीती नाही. ट्रॅक्टर वरील सोफ्यावरून भाजपकडून टिकेबद्दल बोलताना ते म्हणाले कि , कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी सोफ्याची व्यवस्था केली तर ठीक आहे पण देशाच्या पंतप्रधानांनी केवळ दुसऱ्यासारखे विमान आपल्याला फिरण्यासाठी असावे म्हणून करतो रुपये खर्चून दोन विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल कुणीच बोलत नाही ?

पत्रकारांनी हाथरस प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. तुम्हाला पोलिसांनी धक्का दिला , प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की झाली. याकडे तुम्ही कसे बघता ? त्यावर राहुल गांधी म्हणाले, या सरकारकडून देशाला धक्का दिला जातोय त्यापेक्षा मला लागलेला धक्का मोठा नाही.  सरकारच्या विरोधात उभे राहायचे तर धक्का तर खावाच लागेल त्याचे मला काहीच वाटत नाही. केवळ हाथरस मधील पिडीतेलाच नव्हे तर देशातील हजारो पीडित महिलांसाठी मी गेलो होते. मला पीडितेच्या कुटुंबियांना हा विश्वास द्यायचा होता कि , तुम्ही एकटे नाहीत आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!