AurangabadCrimeNewsUpdate : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलीस पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद – पोलिसआयुक्तालयात बाॅम्ब शोधक नाशक पथकात काम करणार्या कर्मचार्याच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन जगन्नाथ पगारे असे आरोपीचे नाव आहे पाच वर्षांपूर्वी नितीन पगारेचे सुरत मधील नवसारी येथील शितल बोरसे शी लग्न झाले होते. लग्नानंतर एकाच वर्षात शितलच्या आई वडलांनी नाशिक येथील महिला तक्रार निवारण केंद्रात नितीन पगारे विरुध्द मारहाण केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर हे भांडण मिटवून शितल आणि नितीन यांनी संसार सुरु केला होता. त्यांना दोन मुलेही झाली आहेत. नितीन पगारे हा जळगाव जिल्ह्यातील पहुर पायरीचा आहे. नितीनचे आई वडिल कधी कधी औरंगाबादेत नितीन कडे येत होते. त्यावेळेस शितलचा माहेरुन सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे आणण्यासाठी छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून ४आक्टोबर २०रोजी फाशी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी नितीन सहित त्याचे वडिल जगन्नाथ, सासु मंगला, दीर सचिन विरुध्द शितल पगारे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त करंत आहेत.