HariyanagangRapecase : Zomato आणि Swiggy च्या चार डिलिव्हरी बॉयने केला सामूहिक बलात्कार , चौघांच्याही मुसक्या आवळल्या

उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशभर संतापाची लाट उसळलेली असली तरी बलात्काराच्या घटना काही कमी व्हायला तयार नाहीत . हरियाणातल्या गुरुग्राममध्येही अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेत चार जणांनी एका तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचारही सुरू आहेत. घटनेनंतर अटक करण्यात आलेले आरोपी हे Zomato आणि Swiggy चे डिलिव्हरी बॉय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुग्रामच्या पॉश समजल्या जाणाऱ्या DLF फेज-2मध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. पंकज, पवन, रंजन आणि गोविंद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुग्राम पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या चौघांनाही अटक केली आहे. गुरुग्रामच्या DLF फेज-2 भागात आरोपींपैकी एक तरूण राहात होता. त्याने आपल्या खोलीवर या तरुणीला बोलावलं होतं. त्यानंतर त्याचे तीन मित्रही तिथे आले. त्या चौघांनीही तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच ते नराधम थांबले नाहीत तर त्यांनी तिला मारहाणही केली त्यात पीडित युवती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर युवतीला रात्री अडीच वाजताच्या सुमारास गंभीर अवस्थेत दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. नंतर पोलिसांनी तिला गुरूग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.