Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : माणसाच्या रुपातले सैतान , अल्पवयीन मुलींवर काकांनीच बलात्कार केल्याच्या दोन संतापजनक घटना…

Advertisements
Advertisements
Spread the love

मावशीकडे पाहुणी म्हणून येऊन राहिलेल्या ८ वर्षीय मुलीवर काकाने वेळोवेळी अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना जांभुळपाडा (चावे) येथे समोर आली आहे. या घटनेने नात्याला काळीमा फासल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. जांभिवली येथे राहणारी आठ वर्षीय मुलगी शाळा बंद असल्याने मावशीकडे येऊन राहिली होती. या दरम्यान २६ वर्षीय काकाची तिच्यावर वाकडी नजर पडली आणि त्याने तिला दमदाटी करून वेळोवेळी तिच्यावर अमानुष अत्याचार केला. या अत्याचाराने त्रस्त झालेल्या भाचीने तिच्यावर होणाऱ्या अमानुष घटनेची माहिती मावशीला सांगितली असता तिला धक्काच बसला. या घटनेने व्यथीत होऊन तिने अल्पवयीन मुलीला घेऊन गणेशपुरी पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलीस ठाण्यात कथन केला. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार व पोक्सॉअंतर्गत गुन्हा दाखल करून उशिराने अत्याचारी काकाला अटक केली आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा पोलीस ठाण्याचे वपोनि महेश सगडे यांनी अत्याचारी काकाला अटक केली आहे.

Advertisements

आजोबाच्या चिंतेची आग थंडही झाली नव्हती, तोच काकाने केला अल्पवयीन पुतणीवर बलात्कार

दुसऱ्या एका घटनेत चंद्रपूर जिल्ह्यात बारा वर्षांच्या मुलीवर नात्यातील चुलत काकानेच  अत्याचार केला असल्याचे धक्कदायक वृत्त आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील येनबोथला गावातील ही घटना असून २६ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा संतापजनक प्रकार समोर आला. गोंडपिंपरी तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर येनबोथला येथे पीडित मुलीच्या आजोबाचे निधन झाले होते.  त्यामुळे दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी पाहुण्यांसह जेवण करायला बसले. तेंव्हा पाहुण्यांना जेवण देत असताना सदर मुलगी घरातून बाहेर पडली. यावेळी कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी काका कमलाकर राऊत याने तिला घराजवळच असलेल्या रांजीत नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळातच मुलीचे वडील हे घराबाहेर निघाले असताना मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. दरम्यान आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असता घटनास्थळावरून आरोपी कमलाकर राऊत याने पळ काढला. मुलीला विचारपूस केली असता काकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिने दिली.

Advertisements
Advertisements

एवढंच नाही तर यापूर्वी देखील कमलाकर राऊत याने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. ‘ही माहिती कुणाला सांगितली तर तुला जीवे मारीन, अशी धमकी सुद्धा दिली होती. त्यामुळे भीतीपोटी मुलीने घरच्यांना ही बाब सांगितली नाही. मुलीवर झालेला अत्याचार पाहून पालकांनी लगेच रात्री गोंडपिपरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने येनबोथला गाव गाठले आणि गावालगत पाण्याच्या टाकीजवळ लपून असलेल्या कमलाकरला ताब्यात घेत  गुन्हा दाखल केला. पीडित मुलीला उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील प्रमुख माणसाच्या मृत्यूनंतर त्याच रात्री बारा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या काकाच्या कृत्याबाबत तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, या नराधमावर तातडीने कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!