Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangRapeandMurder : प्रियांका गांधी यांनी पिडीत परिवाराच्या वतीने उपस्थित केले हे पाच मुद्दे

Spread the love

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी सायंकाळी हाथरसमध्ये  पीडितेच्या कुटुंबियांची भेटी घेतली. यावेळी  राहुल आणि प्रियंकाने पीडितेचा भाऊ, वडील आणि आईशी बंद खोलीत सुमारे एक तास संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरीही त्यांच्यासमवेत तेथे होते. या भेटीनंतर या परिवारानं उपस्थित केलेले पाच प्रश्न प्रियांका गांधी यांनी योगी सरकारला विचारले आहेत.

1.सुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे

2.हाथरसच्या DM ना निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये

3.आमच्या मुलीच्या मृतदेहावर आमची संमती न घेता पेट्रोल टाकून जाळण्यात का आला?

4.आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?

5.आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?

डीएमला कोण वाचवत आहे? – प्रियांकांचा सवाल

या प्रकरणातील पीडित परिवाराच्या म्हणण्यानुसार हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली आहे त्यामुळे हे कुटुंब भयभीत झाले आहे.त्यामुळे त्यांना  तात्काळ निलंबितकरण्यात यावे आणि सर्व प्रकरणात त्यांच्या भूमिकेची देखील चौकशी करावी. जर पीडित परिवार न्यायालयीन चौकशीची मागणी  करीत असताना सीबीआय चौकशीची घोषणा कशाला ?  यूपी सरकार झोपेतून जागे झाले असेल तर पीडित परिवाराची मागणी त्यांनी पूर्ण करावी, असंही प्रियांका यांनी म्हटलं आहे.

drmyan पीडित कुटुंबाशी झालेल्या भेटीदरम्यान प्रियंका गांधी यांनी पीडित मुलीच्या आईला मिठी मारली आणि त्यांचं दु:ख वाटण्याचा प्रयत्न केला. पीडित कुटुंबाच्या घराबाहेर सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चर्चेवेळी राहुल यांनी पीडितेच्या कुटुंबाला विचारले की तुम्हाला न्याय मिळेल असे तुम्हाला वाटते का? त्यावर तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या, असे कुटुंबीय म्हणाले. चर्चेनंतर राहुल गांधी म्हणाले, “आम्ही पीडित कुटुंबासमवेत आहोत. सरकार त्यांना घाबरवत आहे, त्यांना धमकावत आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यूपी सरकार सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहे. कुटुंबाला धमकावून त्यांची सही घेतली आहे. तर पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, “पीडितेच्या कुटुंबाला न्यायालयीन चौकशी हवी आहे. कुटुंबाला मुलीचा चेहरादेखील दिसू शकला नाही. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!