Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasgangRapeCase : हाथरस घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची पीडित कुटुंबीयांची मागणी

Spread the love

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील  पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची  सुप्रीम कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी  करावी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी  केली आहे. पीडितेच्या भावाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे. जेंव्हा कि उत्तर प्रदेश सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले असून या प्रकरणाची एसआयटी कडूनही स्वतंत्ररित्या चौकशी चालू आहे.

दरम्यान कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा यांनीही  हाथरस प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. सर्वात वाईट वागणूक जिल्हाधिकाऱ्यांची  होती, असे  हाथरसच्या पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे. मग जिल्हाधिकाऱ्यांना कोण पाठिशी घालतंय? त्यांना त्वरित निलंबित करून या संपूर्ण प्रकरणात त्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले  आहे. पीडित कुटुंब न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहे. मग एसआयटीकडून चौकशी सुरू असताना सीबीआय चौकशीची  चर्चा का  होत आहे. युपी सरकारची झोप उडाली असेल तर त्यांनी पीडित कुटुंबियांना  ऐकलं पाहिजे, असे  प्रियांका गांधी म्हणाल्या. दरम्यान या प्रकरणात  युपी सरकारने शुक्रवारी पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षकांसह पाच पोलिसांना निलंबित केले आहे.   त्याच बरोबर पीडितेच्या कुटुंबियांना धमकावणारे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण लक्षकार यांनाही  निलंबित करण्याची मागणी होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!