Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangRapeCase : मोठी बातमी : वाढता जनक्षोभ आणि टीका लक्षात घेता हाथरस प्रकारच्या चौकशीची जबाबदारी सीबीआयवर

Spread the love

उत्तर प्रदेशच्या  हाथरस जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्याचबरोबर  उत्तर प्रदेश सरकारवर यावरून सर्वस्तरातून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता हाथरस येथील घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी केंद्रसरकारकडे मागणी केली आहे . दरम्यान, दरम्यान  आज उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी या कुटुंबाची भेट घेतली. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अवस्थी यांनी या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना दिले होते.

दरम्यान ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश पोलिसांनी हे प्रकरण हाताळले त्यावरून पीडितेच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांकडून न्याय मिळणार नाही अशी प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली होती. प्रारंभीच तपासात गांभीर्य न दाखविणे, मुलीला चांगल्या रुग्णालयात उपचार न देणे , पीडितेचे निधन झाल्यानंतर तिच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करणे , देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान यांनी या विषयावर मौन धारण करणे यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया येत असल्याने आणि देशभर या विषयावरून आंदोलन तीव्र होत असल्याने अखेर मुख्यमंत्री योगी यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे.

“आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि या घटनेतील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे त्यांना आश्वासन दिले. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. कुटुंबीयांचे जवाब देखील नोंदवून घेण्यात आलेले आहे.” असे या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अवस्थी म्हणाले होते. तर, या अगोदर हाथरस घटनेवर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  “उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे,” असं  म्हटले  होते . तरीही सरकारविरुद्धचा असंतोष काही केल्या कमी होताना दिसत नाही.

सीबीआय चौकशीच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देताना पीडितेच्या भाऊ म्हणाला कि , आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केलीच नव्हती. सरकारने स्थापन केलेल्या एसटीलाही आम्ही सहकार्य केले. त्यात सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!