Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HatharasGangRapeCase : अखेर आज मीडिया जेंव्हा मीडिया पीडितेच्या घरी पोहोचला , तेंव्हा काय झाले ?

Spread the love

सरकारवर विश्वास नाही. आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, आम्हाला यूपी पोलिसांवर विश्वास नाही अशा शब्दात हाथरस घटनेत पीडितेच्या परिवारानं पोलिस आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. अखेर पीडितेच्या गावात मीडियाला प्रवेश दिला आणि मीडियासमोर आपल्या भावना व्यक्त करताना , पीडितेच्या कुटुंबीयांनी  म्हटलं आहे की, डीएम यांनी आम्हाला धमकावलं तसंच पोलिसांनी मारहाण देखील केली. पीडितेच्या भावानं म्हटलं आहे की, आमचे फोन सर्विलांसवर आहेत. डीएमने आम्हाला धमकी दिली आहे. आम्हाला कुणाशी बोलण्यास बंदी घातली तसंच बाहेर देखील निघू दिलं नाही. पीडितेच्या परिवारानं म्हटलं आहे की, पोलिसांनी आम्हाला सांगायला हवं होतं की, त्यांनी कुणाला जाळलं. कुणाच्या सांगण्यावरुन आमच्या मुलीला जाळलं. दरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज पुन्हा हाथरसला जाऊ शकतात. १ ऑक्टोबर रोजी हाथरसला निघालेल्या राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली होती. तसंच त्यांना अटक देखील केली गेली होती.

पीडितेच्या बहिणीनं सांगितलं की, हाथरसचे डीएम प्रवीण कुमार यांनी परिवाराला धमकी दिली. त्यांनी म्हटलं की, जर मुलगी कोरोनानं मेली असती तर मदत देखील मिळाली नसती. आम्हाला मृतदेह देखील पाहून दिला नाही.  पीडितेच्या आईने मृतदेह घरी आणण्याची मागणी केली होती. ती मागणी देखील मान्य केली नाही. पीडितेच्या भावानं सांगितलं की, माझ्या बहिणीसोबत गँगरेप झाला. वडिलांची प्रकृती अजून खराब आहे. प्रशासन आम्हाला कुणाशी बोलू देत नाही. आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, आम्हाला यूपी पोलिसांवर विश्वास नाही. पोलिसांनी परिवाराला मारहाण केली. आईनं देखील सरकारवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. डीएम मदत देण्याचं बोलत होते. मात्र आम्हाला मदत नको. मदतीनं आमची मुलगी परत येणार नाही.

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पत्रकारांची  टीम जेंव्हा पीडितेच्या घरी पोहोचली तेंव्हा पीडितेच्या भाऊ म्हणाला कि , आमचे फोन सर्विलांसवर आहेत. डीएमने आम्हाला धमकी दिली आहे. आम्हाला कुणाशी बोलण्यास बंदी घातली तसंच बाहेर देखील निघू दिलं नाही. पीडितेच्या परिवारानं म्हटलं आहे की, पोलिसांनी आम्हाला सांगायला हवं होतं की, त्यांनी कुणाला जाळलं. कुणाच्या सांगण्यावरुन आमच्या मुलीला जाळलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिले आहेत की, हाथरसमध्ये मीडियाला जाण्याची परवानगी दिली जावी.

राज्य शासनाकडून काल हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर सिंह, क्षेत्राधिकारी (सीओ) राम शब्द, पोलीस निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, उपनिरीक्षक जगवीर सिंग आणि महेश पाल यांना निलंबित करण्यात आले आहे. हाथरस प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे. तसेच दोन्ही पक्षांची (पीडित आणि आरोपी) नार्को टेस्ट केली जाणार आहे. त्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत ट्वीट करत म्हटलं की, उत्तर प्रदेशातील माता-भगिनींचा सन्मान आणि स्वाभिमानाला हानी पोहण्याची कल्पना करणाऱ्यांचा विनाश निश्चित आहे. अशांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात एक उदाहरण ठरेल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक माता-भगिनींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आणि वचन आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!