CoronaMaharashtraUpdate : राज्यासाठी दिलासादायक बातमी , कोरोनमुक्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ

Maharashtra reports 14,348 new #COVID19 cases, 278 deaths and 16,835 discharges today. Total cases in the state rise to 14,30,861, including 37,758 deaths and 11,34,555 discharges. Active cases stand at 2,58,108: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/Wh5XdhZAmu
— ANI (@ANI) October 3, 2020
महाराष्ट्राच्या दृष्टीने कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक वृत्त असून दिवसभरात राज्यात १६ हजार ८३५ रूग्णांनी करोनावर मात केली आहे . त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाखांच्या वर पोहोचली आहे. दरम्यान देशात मात्र कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असला तरी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे दिवसभरात नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.
दरम्यान गेल्या २४ तासात राज्यात १४ हजार ३४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २७८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांमध्ये राज्यात १६ हजार ८३५ जणांनी कोरोनावर मात केली असून आता राज्यातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाख ३४ हजार ५५५ इतकी झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १४ लाख ३० हजार ८६१ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत राज्यात ३७ हजार ७५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या राज्यात २ लाख ५८ हजार १०८ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दर ७९.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत राज्यात ७० लाख ३५ हजार २९६ जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १४ लाख ३० हजार ८६१ जणांना करोनाचं निदान झाल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं आहे.