MaharashtraNewsUpdate : उत्तर प्रदेशचं सरकार काहीतरी लपवतंय… खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

I think UP government wants to hide something. What happened with Rahul and Priyanka Gandhi & Congress workers, and the kind of statements by DM & others, prove that UP government wants to hide something: Supriya Sule, NCP on #Hathras incident. pic.twitter.com/YgFjnFqKrn
— ANI (@ANI) October 2, 2020
उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील बलात्काराच्या घटनांवरून ‘उत्तर प्रदेशचं सरकार काहीतरी लपवतंय,’ असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मंत्रालयासमोरच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हाथरस व बलरामपूर येथील बलात्काराच्या घटनानंतर संपूर्ण देशभरात संताप आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकार व केंद्रातील मोदी सरकारवरही विरोधकांनी निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ‘राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारची वक्तव्ये केली ते पाहता
‘अवघ्या दोन दिवसांत उत्तर प्रदेशात बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री वा मुख्यमंत्री यावर काहीही बोललेले नाहीत. त्यामुळं पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालून सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी सुळे यांनी केली आहे. ‘देशात अराजकासारखी परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशातही कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला उत्तर प्रदेशातील महिलांचं संरक्षण करता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा,’ असंही त्या म्हणाल्या.