WorldNewsUpdate : संयुक्त राष्ट्र भारताला निर्णय प्रक्रियेत कधी घेणार? मोदींनी उपस्थित केला प्रश्न

From India’s Neighbourhood First Policy to our Act East Policy, as well as idea of security & growth for all in the region, or our views towards the Indo Pacific region, we have always worked for the interests of humankind & not driven by our own self-interests: PM Modi #ModiAtUN pic.twitter.com/zqsDD8bJsw
— ANI (@ANI) September 26, 2020
गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून आपण या करोनाशी लढा देतो आहे. ही आपण प्रत्येकाने आत्ममंथन करण्याची वेळ आहे. जागतिक संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांमध्ये संयुक्त राष्ट्राने कार्यपद्धतीत सुधारणा केली पाहिजे अन्यथा विश्वासार्हता संपेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रीय महासभेत आपले मत मांडले . कोरोनाची साथ हे जागतिक संकट आहे. संयुक्त राष्ट्रात बदलांची प्रक्रिया सुरु झाली ती पूर्ण कधी होणार? भारतातील जनता दीर्घकाळापासून त्याची वाट बघते आहे. ही प्रकिया कधी संपणार या चिंतेत भारतीय आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत हा देश आहे. भारतात जगातले १८ टक्के लोक वास्तव्य करतात. भारत हा एक असा देश आहे ज्या देशाला विविध भाषा, पंथ आणि विचारधारांची परंपरा आहे. भारतात होणाऱ्या बदलांचा प्रभाव हा जगावर होतो. अशा देशाला किती काळ वाट बघावी लागणार? संयुक्त राष्ट्र भारताला निर्णय प्रक्रियेत कधी घेणार? हा प्रश्नही मोदींनी विचारला आहे.
#WATCH As the largest vaccine producing country of the world, I want to give one more assurance to the global community today. India’s vaccine production and delivery capacity will be used to help all humanity in fighting this crisis: PM Modi #ModiAtUN pic.twitter.com/QS5M5hltMg
— ANI (@ANI) September 26, 2020