Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राज्यसभेतील गदारोळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली “हि” प्रतिक्रिया….

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रचंड गदारोळात राज्यसभेत कृषि विषयक दोन विधेयके मंजूर होत असताना ही विधेयकं राज्यसभेत मांडल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी या विध्येयकांना प्रचंड विरोध केला खरा परंतु सभागृहात विरोधकांचा गदारोळ सुरू असतानाच  आवाजी मतदानानं सरकारने ही विधेयकं मंजूर करून घेतली. या विधेयकांच्या मंजूरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही दिली.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही विधेयक मंजूर झाल्यानंतर  ट्विट करून शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्था कायम राहणार असल्याची ग्वाही दिली.  या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , मी आधीही बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो एमएसपी व्यवस्था कायम राहिल. सरकारी खरेदी कायम राहिल. आम्ही इथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य होईल तितके प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचं जगणं अधिक सुखकर करू,” असं मोदी यांनी म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान राज्यसभेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन्ही विधेयके आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आली. ही विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सभागृहात मांडली. चर्चेवेळी विरोधकांनी विधेयकांनी प्रचंड विरोध करत घोषणाबाजी केली. या गदारोळातच विधेयक मंजूरीसाठी आवाजी मतदान घेण्यात आलं आणि हि विध्येयकं मंजूर झाली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!