kanganaCotroversy : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी कंगनाची कशी उडवली खिल्ली एकदा बघाच ….

https://www.instagram.com/p/CFBaa8DJka-/?utm_source=ig_embed
प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत आहे. याच्याच संदर्भात प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेलं मीम शेअर करून कंगनाची खिल्ली उडवली आहे. मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू झाला आहे. या वादात कंगनाचे चाहते तिला समर्थन देताना राणी लक्ष्मीबाईंची उपमा देताना दिसतायत. यावरून प्रकाश राज यांनी एक मीम शेअर केलं आहे. या मीममध्ये कंगना जर एक चित्रपट करून स्वत:ला राणी लक्ष्मीबाई समजत असले तर दीपिकाही पद्मावती, हृतिक अकबर, शाहरूख अशोक, अजय देवगन भगत सिंह, आमिर खान मंगल पांडे आणि विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी असायला हवेत. प्रकाश राज यांनी यापूर्वी देखील कंगनावर अनेकदा टीका केली आहे.
दरम्यान, कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दांत उल्लेख करतानाच, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. खासकरून शिवसेनेशी पंगा घेतल्यानंतर मुंबईतील तिच्या बेकायदा बांधकामावर हातोडा पडल्यानंतर कंगना राणावतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कंगनाच्या कथित अमली पदार्थ व्यवहारप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. कंगना ही अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा दावा अभिनेता शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत केला होता. त्या मुलाखतीचा हवाला देऊन नुकत्याच झालेल्या मुंबईतील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी सभागृहात लावून धरली होती. त्याबाबतची चौकशी मुंबई पोलिस करतील, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.