Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : प्रशांत भूषण ऑन पीएम : जरा हटके !! का व्हायरल होतोय हा २७ सेकंदाचा व्हिडीओ जरा बघाच ….

Advertisements
Advertisements
Spread the love

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण त्यांच्या या ट्विटमुळे चांगलेच व्हायरल झाले आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडाला कशी मदत केली हे सांगणारा आणि त्याची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ प्रशांत भूषण यांनी पोस्ट केला आहे. मुळातच पीएम केअर  फंडावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः चर्चेत आहेत आता स्वतःच या फंडाला त्यांनी मदत दिल्याने आणखी चर्चेत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशांत भूषण यांचा हा ट्विटरवरील व्हिडीओ आधारित आहे.

Advertisements

या व्हिडीओत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्या फोटोवरील एनडीटीव्हीच्या बातमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडाला २.२५ लाख रुपये दिल्याचं म्हटलं आहे. या फोटोच्याच बाजूला बहुचर्चित मि. बिन यांचा गाजलेला व्हिडीओ आहे. यामध्ये मि . बिन स्वतःच्या नावाने स्वतः आणि स्वतःलाच तीन पाकीट बाहेर जाऊन लेटर बॉक्सच्या जागेतून पोस्ट करतो आणि मग स्वतःच दार उघडून येतो तेंव्हा घरात तीन पाकिटे आलेली दिसतात तेंव्हा जणू काही हि पाकिटे आपल्याला कुणी तरी पाठवलेली आहेत असे स्वतः भासवतो आणि अत्यन्त आनंदी होऊन पाकीट उचलतो. आणि मागे हास्याचा आवाज असा हा व्हिडीओ आहे . याशिवाय यामध्ये महिषी नाही . मि . बिनच्या या विनोदी व्हिडिओतून एक प्रकारे प्रशांत भूषण यांनी पीएम केअर्सला पंतप्रधानांनी दिलेल्या मदतीची खिल्ली उडवली आहे. प्रशांत भूषण यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!