Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या , बघा कोण कुठे गेले आणि आले ?

Spread the love

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील ४० हून अधिक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पुन्हा मुंबईत बदली झाली आहे. तर, नांगरे पाटील यांच्या पदावर दीपक पांडे हे पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र पोलिस दलात बदल करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करु नयेत अशी विनंती पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर पडल्या होत्या. दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार कृष्णप्रकाश हे सांभाळणार आहेत. तर, अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची तुरुंग महानिरीक्षकपदी बदली झाली असून, प्रताप दिघावकर हे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. मिलिंद भारंबे यांची गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

महत्वाच्या बदल्या

नवी मुंबई आयुक्त – बीपीन कुमार सिंह

मीरा भाईंदर पोलीस आयुक्त – सदानंद दाते

पिपंरी चिंचवड – कृष्ण प्रकाश सिंह

नागपूर – अमितेश कुमार

ठाणे – विवेक फणसळकर (एक्सटेंशन)

पुणे – के वेंकटेशम (एक्सटेऱ्सन)

मुंबई पोलीस सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था – विश्वास नांगरे पाटील

सह पोलीस आयुक्त गुन्हे, मुंबई – मिलिंद भारंबे

सह पोलीस आयुक्त प्रशासन, मुंबई – राजकुमार व्हटकर

सह पोलीस आयुक्त ट्रैफीक, मुंबई – यशस्वी यादव

नाशिक पोलीस आयुक्त – दिपक पांडे

रजनीश सेठ यांनी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) या पदाची जबाबदारी होती. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे नागरी संरक्षण विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  राजेंद्र सिंह यांच्याकडे अप्पर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था मुंबई या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आशुतोष हावरे यांच्याकडे राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र मुंबई या पदाच्या आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्याकडे अँटी करप्शन विभाग मुंबईच्या अप्पर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी होती. अमितेश कुमार यांच्याकडे नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाची तर जय जित सिंह यांच्याकडे अँटी करप्शन विभागाच्या अप्पर महासंचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याशिवाय व्ही.के.चौबे यांची अँटी करप्शन विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. सदानंद दाते यांच्याकडे मीरा-भाईंदर आणि वसई-विरारच्या पोलीस आयुक्तपदाचा तर बिपिन कुमार सिंह यांच्याकडे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आल्या आहे. तर डॉ. जय जाधव यांनादेखील बढती देण्यात आली आहे. याशिवाय निसार तांबोळी, चंद्र किशोर मिणा, संजय दराडे. विरेश प्रभू, सत्य नारायण, ज्ञानेश्वर चव्हाण. नामदेव चव्हाण, आरती सिंग, एस.एच.महावरकर, लक्ष्मी गौतम, एस. जयकुमार, संदीप बी. पाटील, विरेंद्र मिश्रा, प्रताप दीघावकर यांचीदेखील बदली करण्यात आली आहे.

दरम्यान  संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची बदली कऱण्यात आलेली नाही. अमरावतीच्या आयुक्तपदाची जबाबदारी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांना देण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक देवेन भारती यांची त्या पदावरून बदली  करण्यात आली आहे. त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!