MaharashtraNewsUpdate : अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निकालाचे स्वागत करून फडणवीस म्हणाले….

अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं असून यावर आपली प्रतिक्रिया देताना, केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर महाराष्ट्र सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय़ घेत होतं , अशी सरकारवर टीका करताना सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होईल आणि त्यांना मूल्य नसलेली पदवी प्राप्त करावी लागणार नाहीत. आमचेही तेच म्हणणे होते , आवाज’ म्हटल्यावर ‘माझा आवाज कुणी दाबू शकत नाही’, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.
पुण्यातील बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले कि , आज परीक्षा नाही याचा कदाचित काही लोकांना आनंद झाला असता पण भविष्यात त्यांची पदवी काही कामाची राहिली नसती. सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्णय दिला असल्याने विद्यार्थ्यांचा फायदाच होईल, तोटा होणार नाही. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि युवासेनेने जी याचिका केली होती ती फेटाळली आहे. परीक्षेशिवाय युजीसी पदवी देऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे. देशभरातील कुलगुरुंचंही हेच मत होतं. जी कमिटी तयार करण्यात आली होती त्यांनीही हाच रिपोर्ट दिला होता. तरीही केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर महाराष्ट्र सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय़ घेत होतं. त्याचा भविष्यात आमच्या मुलांवर परिणाम झाला असता,”
सुशांतसिंगच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आम्ही घेतले नाही
दरम्यान बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपच्या कोणत्याही नेत्याने प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही आहे. असा खुलासाही फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला .मात्र गेले ४० दिवस जे खुलासे झाले नाहीत ते सीबीयच्या तपासात समोर येत आहेत. मग सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांवर कुणाचा दबाव होता? याचा तपास व्हायला हवा. हार्ड डिस्क नष्ट कुणी केल्या हे देखील समोर यायला हवं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
कोरोनावर परिस्थितीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याची विशेषत: मुंबईची कोरोनाबाबत स्थिती समाधानकारक नाही. मात्र, पुणे जिल्ह्यात चाचण्या संख्या जास्त आहेत. मुंबईतही चाचण्या वाढल्या पाहिजेत. देशातील ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आणि मृत्यूचा असे दोन्ही दर कमी व्हायला पाहिजेत.