IndiaNewsUpdate : सीतापूरात ” गीता ” ने १७ दिवस हवन करून घेत , एक दोन नव्हे तब्बल ६१ ब्राह्मणांना ” असा ” लावला चुना….

सध्याच्या काळात कुठे काय घडेल आणि कोणाला कसे आणि काय म्हणून फसविले याचा नेम नाही . अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील सीतापूरात घडली . आणि या घटनेतील खलनायिकेचे नाव गीता पाठक असे आहे . या गीताबाईंनी पैसे दुप्पट करण्याच्या लालसेने तांत्रिक अनुष्ठान करण्यासाठी बोलावलेल्या ब्राम्हणांनाच फसवले आहे. या कार्यासाठी म्हणून होम-हवन करण्यासाठी सीतापूरमधील आश्रमाच्या प्रमुख असलेल्या गीता पाठक या महिलेने अयोध्या आणि इतर ठिकाणांहून तब्बल ६१ ब्राम्हण बोलावले होते. उत्तम दक्षिणा मिळेल म्हणून तिन्ही मनापासून तब्ब्ल १७ दिवस हवन केले. आणि त्यावर खुश होऊन गीता पाठकने त्यांना दक्षिणाही उत्तम दिली पण दक्षिणा म्हणून मिळालेल्या नोटा चक्क नकली निघाल्या.
दरम्यान आता आपलं बिंग फुटणार हे माहित असल्यामुळे सदर महिला फरार झाली. विशेष म्हणजे दक्षिणा म्हणून दिलेल्या बॅगेत तिने वर असली तर खाली नकली नोटा ठेवल्या होत्या. आपण फसवले गेलो हे कळताच ब्राम्हणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर गीता पाठकने त्यांना धमकी देत गप्प राहण्यास सांगितलं आणि तिथून काढता पाय घेतला . त्यानंतर रिकाम्या हाताने परतण्याशीवाय या ब्रह्मवृंदांसमोर अन्य कुठलाही पर्याय नव्हता. हे प्रकरण पोलिसांना कळविण्यात आले तेंव्हा आश्रमाची झडती घेतल्यानंतर पोलिसांना घटनस्थळी तब्बल 20 लाखांच्या नकली नोटा आढळून आल्या. याप्रकरणी अधिक चौकशी केल्यांनतर ठकसेन गीता पाठक विरुद्ध अनेक ठिकाणी या आधीही गुन्हे नोंदविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.