IndiaNewsUpdate : NEET व JEE परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांचा मोठा खुलासा , केंद्र सरकार परीक्षा घेण्यावर ठाम

NTA DG told me that 7.5 lakhs out of 8.58 lakhs candidates in JEE have downloaded admit cards. For NEET, over 10 lakhs out of 15.97 lakhs candidates downloaded admit cards in 24 hrs. It shows that students want that exams are held at any cost: Education Minister Ramesh Pokhriyal pic.twitter.com/LfOcHfRXSU
— ANI (@ANI) August 27, 2020
करोनामुळे NEET व JEE परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या या परीक्षा नियोजित वेळेत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही देशभरातील राजकीय पक्ष , सामाजिक कार्यकर्ते या परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा केंद्र सरकार परीक्षा घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यानुसार सर्व तयारी झाली असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयल यांनी दिली आहे. दरम्यान कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र NEET व JEE परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, परीक्षा घेण्यावरून दोन गट पडले आहेत.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी या परीक्षेबाबत अधिक माहिती देताना सांगितले कि , “नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांनी मला माहिती दिली आहे की, JEE परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या ८.५८ लाख विद्यार्थ्यांपैकी ७.५ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश ओळखपत्र डाऊनलोड केले आहेत. तर NEETसाठी अर्ज भरलेल्या १५.९७ लाख विद्यार्थ्यापैकी १० लाख विद्यार्थ्यांनीही प्रवेश ओळखपत्र डाऊनलोड केले आहेत. हे कार्ड २४ तासात डाउनलोड करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचीच अशी इच्छा आहे की, कोणत्याही किंमतीत परीक्षा घ्याच, असंच यातून दिसून येतंय,” असं पोखरियाल म्हणाले. “JEE परीक्षेसाठी परीक्षा केंद्राच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी केंद्रांची संख्या ५७० इतकी होती. ती आता ६६० इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर NEETच्या परीक्षा केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे. २ हजार ५४६ वरून NEET परीक्षा केंद्रांची संख्या ३ हजार ८४२ इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची केंद्र देण्यात आली आहेत,” असंही पोखरियाल म्हणाले.