Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaEffectmaharashtra : राज्य सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारकच

Spread the love

केंद्र सरकारने राज्यांतर्गत वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटवले असले तरी महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक आहे. यामुळे ई-पासची अट हटवण्याची मागणी करण्यात येत होती. पण राज्य सरकारने ई-पास कायम राहणार असल्याचे  स्पष्ट केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. राज्यातील खासगी वाहतुकीसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे  अनिल देशमुख यांनी या आधी ट्विट करून स्पष्ट केले . यानंतर अनिल देशमुख यांनी आज ट्विट  करताना म्हटले आहे कि , मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर ‘मिशन बीगिन’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मागर्दशक सूचना यापुढेही कायम राहतील. म्हणजेच खासगी वाहनांना यापुढेही राज्यात वाहतुकीसाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत खासगी वाहनांना ई-पास बधनकारक असेल. करोना व्हायरसच्या लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. यानुसार केंद्र सरकारने राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध उठवले आहेत. खासगी वाहनं आणि मालवाहतुकीवरील निर्बंध हटवल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!