Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : गृहमंत्री अमित शहा यांना भेटलेल्या ” या ” केंद्रीय मंत्र्यालाही कोरोनाने घेरले

Advertisements
Advertisements
Spread the love

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून त्यांच्या संपर्कात आलेले  केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची चाचणी करण्यात आली होती. वास्तविक दोन आठवड्यांपूर्वी ही चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु अचानक तब्येत बिघडल्यामुळे पुन्हा एकदा शेखावत यांची चाचणी असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.  केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्वत: ट्वीट करून हि माहिती दिली आहे. दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर कोरोनावर उपचार चालू आहेत. संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही त्यांनी कोरोना टेस्ट करण्याचं आवाहनही  केलं आहे.

Advertisements

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी .  तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात भर्ती झाल्याची माहिती त्यांनी दिली. अमित शाह यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना टेस्ट करण्याचं आवाहन 3 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपल्यासोबत कुटुंबियांची चाचणीही केली होती मात्र तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!