Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NandedNewsUpdate : मनसे शहर प्रमुख सुनील ईरावारची आत्महत्या, पैसे आणि जातीअभावी राजकारण करता येत नसल्याची व्यक्त केली खंत…

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर प्रमुख सुनील ईरावार वय २७ या तरुणाने  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वतःच्या आईच्या नावे लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्धेशून आपल्या अखेरच्या चिट्ठीत ‘अखेरचा जय महाराष्ट्र करून यापुढे  राजकारण करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही’ असं सांगून आपली जीवनयात्रा संपविली आहे . सुनिल ईरावार हा शहरातील गोकुंदा परिसरात राहत होता. सुनिल हा मनसेच्या शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होता. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास सुनिलने राहत्या घरात साडीच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिलने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान घरातील सदस्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुनिलचा मृतदेह ताब्यात घेतला. घराची पाहणी केली असता सुनिलने आत्महत्येपूर्वी एक सुसाई़ड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली.

Advertisements

सुनील ईरावारची सुसाईड नोट 

‘अखेरचा जय महाराष्ट्र’

यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे पुढील माझ्या मर्जीप्रमाणे संपवत आहे. तरी माझ्यामुळे कुणालाच त्रास देऊ नका.

राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथं पैसे आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि दोन्हीही माझ्याजवळ नाही.

जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे

आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पूदादा, मला माहिती आहे मी माफ करण्याचा लायकीचा नाही, तरी तुम्ही मला सर्वजण मला माफ करशाल अशी आशा बाळगतो.

आई मला माफ करं,

तुझाच सुनिल

दरम्यान सुनिलची सुसाईट नोट वाचून शहरातील मनसे कार्यकर्त्यांना व्यथित झालेअसून सुनिलच्या आत्महत्येमुळे ईरावार  कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणीत आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. सुनिल हा राज ठाकरे यांचा कट्टर चाहता होता.14 जून रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘माझ्या दैवताचा वाढदिवस’ म्हणून त्याने राज यांचा वाढदिवस साजरा केला होता.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!