Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात दिवसभरात 11111 नवीन रुग्णांची नोंद , 288 जणांचा मृत्यू

Spread the love

राज्यात गेल्या २४ तासांत २८८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आज दिवसभरात ११ हजार १११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या सहा लाखांच्या जवळपास पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी करोनामुक्त रुग्णांचा आलेख वाढला होता. मात्र अचानक घट झाल्यानं चिंता वाढली आहे. आज दिवसभरात ८ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरे परतले आहेत, त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ७० टक्के इतका झाला आहे.

आज राज्यात ११ हजार १११ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज वाढलेल्या करोना रुग्णांमुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या पाच लाख ९५ हजार ८६५च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळं प्रशासनाची झोप उडाली आहे. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० चाचण्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकीचे निगेटिव्ह आले आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत २८८ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले. आतापर्यंत एकूण २० हजार ०३७ रुग्णांचा करोनाविरोधी लढा अयशस्वी ठरला असून सध्याचा मृत्यूदर ३.३६ टक्के इतका आहे.सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर, राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज नोंद झालेले मृत्यू

मुंबई मनपा-१०१० (४७), ठाणे- १६६ (२), ठाणे मनपा-२०६ (६),नवी मुंबई मनपा-३८४ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३५१ (२), उल्हासनगर मनपा-२५ (७), भिवंडी निजामपूर मनपा-३४ (१), मीरा भाईंदर मनपा-१४० (८), पालघर-२३१ (१), वसई-विरार मनपा-१६० (३), रायगड-२४५ (५), पनवेल मनपा-१५३ (१), नाशिक-१६० (२), नाशिक मनपा-४७८ (६), मालेगाव मनपा-४१, अहमदनगर-१९९ (१),अहमदनगर मनपा-९५ (९), धुळे-२४ (७), धुळे मनपा-२९ (२), जळगाव-४६९ (७), जळगाव मनपा-१२९, नंदूरबार-६, पुणे- ६४४ (१२), पुणे मनपा-१५३९ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१९), सोलापूर-१७७ (५), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-१९८ (८), कोल्हापूर-२९५ (२९), कोल्हापूर मनपा-२२३ (७), सांगली-१७४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (९), सिंधुदूर्ग-४, रत्नागिरी-६१ (३), औरंगाबाद-६८ (१),औरंगाबाद मनपा-७२ (३), जालना-७८, हिंगोली-४५, परभणी-२७, परभणी मनपा-४९ (१), लातूर-१२१ (१), लातूर मनपा-११६, उस्मानाबाद-१२७ (२), बीड-८५ (१), नांदेड-५० (३), नांदेड मनपा-१६, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१३ (१), अमरावती-४०, अमरावती मनपा-६४ (२), यवतमाळ-५४, बुलढाणा-५९ (३), वाशिम-२५, नागपूर-१३९ (३), नागपूर मनपा-५५२ (१३), वर्धा-१०, भंडारा-२२ (१), गोंदिया-१४ (१), चंद्रपूर-२४ (१), चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-३, इतर राज्य २०

आपलं सरकार

Click to listen highlighted text!