AurangabadNewsUpdate : निवृत्त पोलिस अधिकार्याच्या मुलाचा खदाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू

औरंगाबाद पोलिसआयुक्तालयातून निवृत्त झालेले फुलचंद उंबरे यांच्या मुलाचा शुक्रवारी संध्याकाळी ७.३०वा.खदाणीच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे.या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
चंद्रकांत फुलचंद उंबरे(१९) रा. श्रीकृष्णनगर हडको असे मयताचे नाव आहे.
चंद्रकांत फुलचंद उंबरे (१९, रा. कृष्णनगर, हडको, एन-९) . चंद्रकांत हा शुक्रवारी दुपारीच्या सुमारास मित्रासोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास तो व त्याचे मित्र बेगमपुरा परिसरातील नजीर पहेलवान यांच्या विटभट्टीमागे असलेल्या खदाणीजवळ गेले. खदाणीत साचलेल्या पावसाच्या पाण्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यांनी चंद्रकांतसह त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चंद्रकांतच्या नाका-तोंडात पाणी गेले. त्यामुळे तो बेशुध्द होऊन पाण्यात बुडाला. हा प्रकार सोबतच्या मित्रांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विटभट्टीवरील मजूरांना सांगितला. त्यानंतर रात्री उशिरा चंद्रकांतला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास जमादार दत्तात्रय गवळी करत आहेत.