AurangabadNewsUpdate : पोलिस उपनिरीक्षकाच्या पतीच्या प्रसंगावधानामुळे जिवीतहानी टळली

औरंगाबाद : सिडको औद्यौगिक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक मीरा लाड यांचे पती धनराज घुगे यांनी तीन आणि आठ वर्षांच्या दोन मुलांचा गॅस सिलेंडरच्या नळीने पेट घेतलेला असतांना प्रसंगावधान राखत दोन्ही मुलांना घराबाहेर काढले व गरम झालेले सिलेंडर मैदानात आणून फेकले. सुतगिरणी चौक सुतगिरणी परिसरातील लक्ष्मीनगरात संजय आधाने राहतात. हे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी करतात.अधानेंच्या घरात आज सकाळी ११वा. गॅस सिलेंडरच्या नळीने अचानक पेट घेतल्याने घरगुती साहित्याचे अंदाजे पन्नास हजाराचे नुकसान झाले.
लक्ष्मीनगरातील संजय आधाने (रा. प्लॉट क्र. ९९) यांच्यासह घरमालक वासुदेव भावलाल महाजन व अन्य चार भाडेकरु राहतात. बकरी ईदची सुटी असल्याने आधाने दाम्पत्य घरीच होते. सकाळी स्वयंपाकाची तयारी सुरू असल्याने आधाने यांच्या पत्नीने गॅस पेटवला. त्यावेळी अचानक सिलेंडरच्या नळीने पेट घेतला. त्यामुळे घाबरुन गेलेल्या आधाने यांच्या पत्नीने स्वयंपाक खोलीतून बाहेर धाव घेतली. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे घुगे यांनी प्रसंगावधान दाखवत मदंत केली. धनराज घुगे यांचे बीड बायपास रस्त्यावर अर्जून आॅटोमोबाईल नावाचे दुकान आहे. दरम्यान अग्निशमन दल व जवाहरनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलातील प्रमुख एस. के. भगत, वैभव बाकडे, एस. पी. भोसले, अशोक वेलदोडे, बी. जी. भावले, दिनेश वेलदोडे, आदीनाथ बकले आणि बाबासाहेब तारे यांनी घरातील साहित्याची व गॅसची तपासणी केली. धनराज घुगे यांच्या धाडसामुळे आधाने कुटुंबियांचा जीव वाचला व पुढील अनर्थ टळला.