Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : दिवसाला नवीन ५० हजार रुग्णांची भर , देशातील कोरोनाग्रस्तांचा देशातील आकडा 14 लाखावर…

Spread the love

देशभर कोरोनाचा कहर चालूच असून जुलैच्या अखेरच्या सप्ताहात  दिवसाला 50 हजाराच्या आसपास नवीन रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण होण्याचा वेग जवळपास दुप्पट झाला आहे. कोरोनाचा हा विस्फोट चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सर्वजण कोरोनाची लस बाजारात कधी उपलब्ध होणार याकडे लक्ष देऊन आहेत. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 9431, आंध्र प्रदेशात 7627, तमिळनाडू 6986, कर्नाटक 5199 आणि उत्तर प्रदेशात 3246 नवीन कोरोनाच्या केसेस मिळाल्या आहेत. कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये आणि काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मन की बात या कार्यक्रमातून नागरिकांना केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका दिवसात जवळपास 49 हजार 931 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून कोरोनाग्रस्तांचा देशातील आकडा 14 लाखावर पोहोचला आहे. कोरोनामुळे 24 तासांत 708 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशातील मृतांचा आकडा 32,771वर पोहोचला आहे. कोरोना विरुद्धची लढाई यशस्वीपणे पार करून आतापर्यंत 9 लाख 17 हजार 568 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 लाख 85 हजार 114 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात कोरोनाचा रिकव्हरि रेट 63.92 आहे. गेल्या 24 तासांत सर्वात जास्त 5 राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!