Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : “राम मंदिराच्या कामाला सुरुवात होताच कोरोना नष्ट होईल , घाबरू नका…” तर संत म्हणतात , ” देशाचे राजे भूमिपूजन करणार आहेत…!!”

Spread the love

बहुचर्चित राम मंदिराच्या उभारणीला दि. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  प्रारंभ  होणार असून, त्यासाठी तयारीही सुरू झाली. राम मंदिराच्या उभारणीची चर्चा सुरू असताना भाजपाचे नेते आणि मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी एक वक्तव्य केलं आहे. देशात करोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. करोनामुळे देशातच नव्हे तर जगभरात चिंतेचे वातावरण असताना,  “राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर देशातील करोना महामारी संपेल,” असे  विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने  एएनआयच्या हवाल्याने  हे वृत्त दिले  आहे.

आपल्या निवेदनात शर्मा यांनी म्हटले आहे कि , “त्यांनी (प्रभू रामचंद्रांनी) मानव जातीच्या कल्याणासाठी आणि राक्षसांना मारण्यासाठी त्यावेळी पूनर्जन्म घेतला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच देशभरात पसरलेली करोनाची महामारी नष्ट होण्यासही सुरूवात होईल,”  “करोनामुळे फक्त भारतच नाही, तर संपूर्ण जग त्रस्त झालं आहे. आम्ही केवळ सोशल डिस्टन्सिगच पाळत नाही, तर देवांचं नामस्मरणही करत आहोत. राम मंदिर बांधण्याचे सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिलेले आहेत,” असं शर्मा म्हणाले.

मंदिराच्या आराखडयानुसार गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.

मुहुर्तावरून संतांमध्ये वाद विवाद , साक्षात देशाचा राजा भूमिपूजन करीत आहे त्यामुळे अशुभ काहीच नाही

राम मंदिच्या भूमिपूजनाच्या मुहुर्तावरून  शंकराचार्य स्‍वरूपानंद सरस्‍वती यांनी म्हटले आहे कि ,  हि वेळ अशुभ आहे. त्यांच्या मतानुसार 5 ऑगस्टला  दक्षिणायन भाद्रपक्ष कृष्‍ण पक्ष की द्वितीया तिथि आहे. विष्‍णु धर्म शास्त्रानुसार आणि नैवज्ञ बल्‍लभ  ग्रंथाच्या सूत्रानुसार त्यांनी म्हटले आहे कि ,   भाद्रपदमध्ये अशा प्रकारचे मंदिराचे भूमिपूजन करता येत नाही.  त्यांच्याशिवाय त्यांचे शिष्‍य अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांनीही या भूमिपूजनाचा अशुभ म्हटले आहे.

दरम्यान काशी विद्वत परिषदेचे  संयोजक डॉ रामनारायण द्विवेदी यांच्या मतानुसार  मंदिर शिलान्यास का मुहूर्त काशी विद्वत परिषदेने सांगितलेला नाही.  दरम्यान या वादविवादावर बोलताना  रामनारायण द्विवेदी यांनी म्हटले आहे कि, हा भूमिपूजन समारोह भगवान रामाच्या मंदिराचा आहे आणि साक्षात देशाचे राजे भूमिपूजन करीत आहेत त्यामुळे यात अशुभ काहीही नाही. या कार्यक्रमाबद्दल बोलताना  श्रीराम जन्मभूमी  तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांचे  उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांनी म्हटले आहे कि ,  ३ ऑगस्टपासूनच राम मंदराचा भूमि पूजन कार्यक्रम सोहळा सुरु होईल. तीन दिवसांपर्यंत हा सोहळा चालेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!