AurangabadCourtUpdate : फरार आरोपी पकडला जात नाही, कोर्टात हजर राहून स्पष्टीकरण द्या, खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद-२०११सालच्या चेक बाऊन्स प्रकरणातील आरोपीला पकडून कोर्टापुढे हजर करण्याच्या २०१६सालच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या आदेशाला पोलिसआयुक्तांनी केराची टोपली दाखवताच खंडपीठाने २४जुलै रोजी पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसादआणि मुकुंदवाडी पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी खुलासा करावा असे आदेश न्या.रविंद्र घुगे आणि न्या.एम.जी.शेवलीकर यांच्या खंडपीठाने बजावले आहेत. या आदेशामुळे गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड राष्र्टवादी काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे आरोपीचा पत्ता विचारत फिरत आहेत.
मिलींद श्रीराम पाटील रा.मायानगर एन.२सिडको असे आरोपीचे नाव आहे. २०११साली आरोपी मिलींद पाटील याने सुंदरवाडीतील एका भूखंडाच्या प्रकरणात कोमल पाटणी आणि नवीन कासलीवाल यांची ४५लाख रु.ची इसारपावती केली. पुढे तो व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे पाटणी आणि कासलीवाल यांनी मिलींद पाटील याला पैशे परंत मागितले. आरोपी मिलींद पाटील ने ४५लाख रु.चा चेक पाटणी आणि कासलीवाल यांना दिला. पण तो बाऊन्स झाला. या प्रकरणी पाटणी आणि कासलीवाल यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्याकडे याचिका दाखल केली.या प्रकरणात २०१५साली आरोपी पाटील याला ६०लाख रु.दंड झाला. या निकालाच्या विरोधात आरोपी पाटील ने जिल्हा कोर्टात अपील केले. जिल्हा कोर्टाने प्रकरण पाहिल्यानंतर आरोपी पाटील ला सांगितले की, २४ लाख रु. जर जिल्हा कोर्टात जमा केले तरंच तुझ्या अपीलाचा विचार केला जाईल.
जिल्हा कोर्टाच्या या निकाला विरोधातही आरोपी मिलींद पाटील खंडपीठात गेला.पण खंडपीठाने जिल्हा कोर्टाच्या निकालात फेर बदल करण्याचे टाळले. हा सर्व घटनाक्रम पाटणी आणि कासलीवाल यांनी अॅड.सागर लड्डा यांच्यावतीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या निर्दशनास आणून दिला.त्याच वेळैस २०१६साली जे.एम.एफ.सी.ने आदेश काढले की पोलिसआयुक्त औरंगाबाद यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून आरोपी मिलींद पाटील याला वाॅरंट बजावावे.पण जे.एम.एफ.सी. च्या या आदेशाला पोलिसआयुक्तांनी केराची टोपली दाखवली. त्यानंतर २०१८ साली आरोपी मिलींद पाटील याने मुलाच्या लग्नाचे फोटो फेसबुकवर अपलोड केले.तसेच केंद्रीय संरक्षणराज्यमंत्री भामरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, रामदास आठवले यांच्या सोबंत केलेले फोटोसेशन २०१९मधे फेसबुकवर अपलोड केले.हा सर्व प्रकार अॅड.लड्डा यांनी न्या. घुगे आणि शेवलीकरांच्या निर्दशनास आणून दिला.म्हणून खंडपीठाने मुकुंदवाडी पोलिस निरीक्षक शरद इंगळेंना आरोपी पाटील बाबत विचारणा केली असता. तो सापडंत नसल्याचा खुलासा पोलिस निरीक्षक इंगळेंनी केला. यावर न्या.घुगे आणि न्या.शेवलीकर यांनी मंगळवारी बजावलेल्या आदेशात म्हटले की,२४तारखेपर्यंत आरोपीच्या वाॅरंट ची बजावणी पोलिसआयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी करावी.अन्यथा खंडपीठात प्रत्यक्ष हजर राहुन खुलासा करा.