मालमत्ता व्यवहार प्रकरणातून अभियंत्याच्या कुटुंबियांना उद्योजकाची मारहाण

औरंगाबाद – १ कोटी १५ लाखांच्या घर खरेदी व्यवहारात अभियंत्याच्या कुटुंबियांना उद्योजकाने ए३ सिडको परिसरातील राजकिय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ३ जुलै रोजी घराच्या बाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गिरीश जोशी हे अकोला येथे सार्वजनिक बांधकाम विभागात अभिक्षक अभियंता म्हणून काम करतात गेल्या आॅगस्ट २०१९ मधे जोशी यांनी उद्योजक मोहन राऊत यांच्या कडून १ कोटी १५ लाख रुपयात घर खरेदी केले. त्या वेळी घर हे युनियन बॅककेकडे गहाण होते. तरीही या व्यवहारात जोशी यांनी बयाना म्हणून १८ लाख रु.दिले व घराचा ताबा घेतला आणि स्टेट बॅकेकडून ९३ लाख ५० हजार कर्ज मंजूर करुन घेतले. व्यवहारात करारनामा झाला होता की, व्यवहार झाल्या पासून तीन महिन्यात राऊत यांनी युनियन बॅकेचे कर्ज फेडून घराचे दस्त ऐवज जोशी यांना सूपूर्द करावे त्या बदल्यात जोशी यांनी व्यवहारातील उरलेली ९३ लाख ५० हजार राऊत यांना द्यावेत पण तीन महिन्यात राऊत यांना युनियन बॅंकेकडून गहाण असलेले घर सोडवता आले नाही म्हणून जोशी यांनी व्यवहार अपूर्ण ठेवला. यानंतर ३ जुलै रोजी राऊत यांनी जोशी यांच्या पत्नी व मुलांना घरात घुसुन घर खाली करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे करंत आहेत