Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : बड्या रुग्णालयात कोरोनाबाधितांची लूट चालूच , एका मोठ्या रुग्णालयाविरुद्ध एफआयआर

Spread the love

कोरोनाबाधित रुग्णांकडून राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच उपचाराची रक्कम घेण्याचे आदेशित करूनही मुंबई आणि राज्यातील मोठ्या शहरातील मोठ्या म्हणविल्या जाणाऱ्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची लूट चालूच असल्याची बाब निदर्शनास आली असून या आदेशाचा भंग करून जास्त पैसे उकळल्या प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. असल्याचे वृत्त आहे. कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारांबाबत शासन, मुंबई महापालिका यांनी उपचार शुल्क आकारणीबाबत सूचना जारी केल्या आहेत. या आदेशांचे पालन होते का?, हे पडताळण्यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालयांवर निरीक्षक नेमले आहेत.

उपल्बध माहितीनुसार , बिलाच्या संदर्भातील कथित फरकामुळे हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  रुग्णालयाने ई-मेलद्वारे माध्यमांकडे आपले म्हणणे मांडले आहे. दादर येथे राहणारी करोना बाधित महिला नानावटी रुग्णालय येथे ३१ मे रोजी दाखल झाली. उपचारादरम्यान १३ जूनला या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित कुटुंबाने महापालिकेकडे रुग्णालयाने जास्त शुल्क आकारल्याबाबत तक्रार केली. याबाबत पालिकेच्या खासगी रुग्णालय निरीक्षकाने चौकशी, तपासणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. महिलेच्या उपचारांसाठी प्रतिदिन पाच पीपीई किट, तीन एन ९५ मास्क (उपलब्ध असूनही), ऍस्पिरिन, पॅरासीटामॉल, बी कॉम्प्लेक्स आदी नियमित वापराची औषधे ‘पॅकेज’मध्ये समाविष्ठ असूनही त्याचे वेगळे शुल्क आकारले गेले. काही वैद्यकीय चाचण्या अनेकदा केल्या गेल्या. तर काही मध्यरात्री १ ते ३ या वेळेत करण्यात आल्या, अशी माहिती निरीक्षकाला मिळाली. नातेवाईकांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निरीक्षकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी रुग्णालय विश्वस्त मंडळावर भारतीय दंड संहितेतील कलम १८८ , ३४ अन्वये  गुन्हा नोंदवला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!