AurangabadNewsUpdate : कौटुंबिक वादानंतर १२ वर्षीय मुलाची आत्महत्या

कौटुंबिक वादानंतर १२ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२७) हर्सूल परिसरातील अंबरहिल भागात समोर आली. किसन राम मकळे (वय १२, रा. अंबलहिल, जटवाडा रोड) असे या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री उशीरा मुलाच्या आईने तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
मयत किसनची आणि अंबरहिल भागातील एका वीटभट्टीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवते. किसनला एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत. शुक्रवारी दुपारी घरात किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात किसन घरातून बाहेर पडला. परंतु रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या आईने हर्सुल पोलीस ठाण्यात किसन हरवल्याची तक्रार नोंदविली. तो अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आणि कुटुंबिय त्याचा शोध घेत होते. शनिवारी सकाळी काही नागरिकांना अंबरहिल भागातील एका विहिरीत मुलाचे प्रेत आढळून आले. या घटनेची माहिती तात्काळ हर्सुल पोलिसांना देण्यात आली. मुलाचे प्रेत असल्याने त्यांना ते किसनचे असल्याचे शंका व्यक्त केली. आणि त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता ते किसनचेच निघाले. अग्नीशमक दलाच्या जवानांनी विहिरीतून काढून घाटीत दाखल केले. याप्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.