AurangabadNewsUpdate : हर्सूल कारागृह : दोन अधिकारी आणि १२ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

औरंगाबाद – हर्सूल कारागृहातील २अधिकारी आणि१२ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची माहिती अधिक्षक हिरालाल जाधव यांनी दिली.
काल ९जून रोजी अधिक्षकासहित सर्व कर्मचार्यांचे स्वॅब नमूने घेण्यात आले होते. त्यामधे अधिक्षक हिरालाल जाधव निगेटिव्ह आले तर दोन वरिष्ठ अधिकारी आणि १२ कर्मचारी पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिला.हे सर्व पाॅझिटिव्ह असिम्टोमेटिक(लवकर आटोक्यात येणारी लक्षणे) असल्याचा दावाही वैद्यकीय अधिकार्यांनी केला आहे.या सर्व पाॅझिटिव्ह रुग्णांना कारागृहाजवळील रेस्टहाऊस मधे होमक्वारंटाईन करण्रात आलेले आहे.गेल्या तीन महिन्यांपासून अधिक्षक हिरालाल जाधव तुरुंगात सर्व कैदी आणि अधिकार्यांची काळजी घेत होते.वेळोवेळी स्वच्छता राखण्यावर त्यांचा भर असे तरीही काही कैद्यांच्या निष्काळजीपणामुळे २९कैदी कोरोनाग्रस्त झालेले आढळले होते.म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांचे स्वॅब काल घेण्यात आले हौते. या सर्व प्रक्रियेनंतर कारागृहातील लाॅकडाऊन आज दुपारी ४वाजेपासून उघडण्याची परवानगी वैद्यकीय अधिकार्यांनी हर्सूल प्रशासनाला दिली आहे.