MumbaiCrime : पोस्को अंतर्गत दाखल केलेला गुन्हा परत घेण्याच्या दबावातून खून

अनैसर्गिक कृत्य केल्यामुळे भावावर पोस्को कायद्यांतर्गत अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील गैबिनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मयत मोहम्मद अक्रम अकबर (वय ४८) हे घरी जात असताना रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जात असताना त्यांना आरोपी ईस्तेखार याने रस्त्यात अडवून त्याचा भाऊ अख्तर सय्यद याच्याविरोधात पुतण्या शेहबाज याने पोस्को अंतर्गत गुन्ह्यात केलेली तक्रार मागे घे, त्या गुन्ह्यामुळे माझ्या भावाला न्यायालयात जामीन होत नसल्याने धमकावले.
दरम्यान मोहम्मद अक्रम अकबर याने, ‘जे व्हायचे ते कोर्टात होईल’ असे उत्तर दिले असता असता या रागातून ईस्तेखार सय्यद याने अबुशमा सय्यद उर्फ अम्मू , इस्माईल अन्सारी, इब्राहिम अन्सारी,इस्राईल अन्सारी ,वसीम उर्फ शेरू या आपल्या ओळखीतील मित्रांना जमा केले. आणि मोहम्मद अक्रम अकबर हे आपल्या घरी जात असताना आरोपी आरोपी ईस्तेखार याने आपल्या साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अक्रम अकबर यांच्या दोन्ही पायावर, डाव्या हातावर लोखंडी रॉडने वार करून फ्रॅक्चर केले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत अकबर यांना रस्त्यावर सोडून घटनास्थळावरून पोबारा केला.
या घटनेनंतर रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या मोहम्मद अक्रम अकबर अली अन्सारी यांना उपचाराकरीता दाखल करण्यात आले. त्याचवेळी त्याच्या तक्रारी वरून मारहाणीचा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. परंतु, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे जखमी अक्रम अकबर अली अन्सारी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्यातील सहा आरोपींना काही तासात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.