CrimeUpdate : गर्भवती महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणारे पोलीस कोठडीत

नागपूर शहरात चाकूचा धाक दाखवून १८ वर्षीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना अंबाझरी भागात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. छोटू ऊर्फ मिथेश दीपक सुदामे (२६) प्रितेश ऊर्फ मनी नरेश बिजवे (वय ३०) व संग्या ऊर्फ संदेश पंडागळे (वय ३०, सर्व रा. सुदामनगरी),अशी अटकेतील नराधमांची नावे आहेत. तिघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला चार महिन्यांची गर्भवती आहे. ३ जूनला तिघांनी पीडित महिलेला चाकूचा धाक दाखविला. बळजबरीने तिला मोटरसायकल बसविले. तिला घेऊन तिघेही पुरोहित ले-आऊट येथे आला. पीडित महिलेला एका इमारतीच्या छतावर घेऊन गेले.तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिलेला ठार मारण्याची धमकी देत तिला घरी सोडले. महिलेने नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. मात्र तिघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने नातेवाइक शांत राहिले. याचदरम्यान घटनेची माहिती अंबाझरी पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय करे यांनी पीडित महिलेला धीर देत संरक्षणाचे आश्वासन दिले. त्यानंतर पीडित महिलेने तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याचदरम्यान तिघेही फरार झाले होते. पोलिसांनी तिघांना अमरावती जिल्ह्यातील पिपळाघाट, बनोडा येथून अटक केली. तिघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांची १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.