स्वतः चांगलं खातो आणि आपल्याला डाळ भात देतो म्हणून ” त्याने ” दोघांचा खून करून केला पोबारा….

लॉकडाऊनच्या काळात मीरारोड येथे एका बारमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी पुण्यातून आरोपीला अटक केली आहे. बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह बारमध्येच असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी हत्येचा छडा लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारचा व्यवस्थापक चांगलं जेवन मागवायचा आणि आरोपीस मात्र फक्त डाळभात खाण्यासाठी द्यायचा, या रागातून हे हत्याकांड घडलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनएल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये हे दुहेरी हत्याकांड घडलं होतं. सदर बारच्या मालकाने याची माहिती गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मीरारोड पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टाकीत दोघांचे मृतदेह आढळून आले. स्वत: मात्र चांगलं जेवण खायचे आणि आरोपीस फक्त डाळभात या रागातून त्याने रात्री झोपेतच दोघांची हत्या केली आणि मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून पळून गेला. सगळ्यात धक्कादायक म्हणजे चक्क ६ गाड्या बदलून आरोपी पुण्यात पोहोचला. बारचा व्यवस्थापक हरेश शेट्टी (४८) आणि सफाईकामगार नरेश पंडित (५२) अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. दोघेही बारचे कर्मचारी होते. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दोन्ही मृतांच्या डोके व शरीरावर जखमा आढळल्या होत्या याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात बार बंद असल्यामुळे शेट्टी, पंडितसह कल्लू राजू हे तिघेच बारमध्ये राहत होते. पण हत्या झाल्यानंतर तो फरार असल्याने पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी तपासास सुरूवात केली असता पुण्याच्या पर्वती पायथ्याजवळील साजन बारमधून आरोपी कल्लू राजू याला ताब्यात घेण्यात आलं. बारचा व्यवस्थापक चांगलं जेवन मागवायचा आणि आरोपीस मात्र फक्त डाळभात खाण्यासाठी द्यायचा, या रागातून हे हत्याकांड घडलं आहे.