Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : जगभरात ६ हजार लहान मुलांचे मृत्यू होण्याची युनिसेफने व्यक्त केली भीती

Spread the love

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडलेले असताना ‘युनिसेफ’ने कोरोनाच्या संसर्गामुळे दर दिवशी जगभरात सहा हजार बालकांचा मृत्यू होण्याची भीती  व्यक्त केली आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडल्यामुळे आणि योग्य आरोग्य सुविधांच्या अभावांमुळे हे मृत्यू ओढावण्याची भीती असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. यामुळे  जगभरातील बालकांच्या जीवनाचा निर्माण झाला आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या जगभरातील बालकांच्या मदतीसाठी १.६ अब्ज डॉलरची मदत मागितली असल्याचे युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि , ‘कोविड-१९’ जोर ओसरल्यानंतर जग वेगळे असणार आहे. अशा स्थितीत हा निधी बालकांच्या सुरक्षितेसाठी उपयोगी येणार आहे . जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. अनेक देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. अमेरिकेतील ‘जॉन्स हॉप्किन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ ने केलेल्या संशोधनाच्या आधारे युनिसेफने सहा हजार बालकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे.

युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोरे यांनी याबाबत सांगितले की, पाच वर्षाच्या आत मृत्यू होणाऱ्या बालकांची संख्या अनेक दशकांत पहिल्यादाच वाढण्याची भीती आहे त्याशिवाय कोरोनाच्या संसर्गामुळे दर महिन्याला जवळपास ५६ हजार ७०० जणांच्या मृत्यू होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी मोठ्या वैद्यकीय सुविधांची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान युनायटेड नेशनच्या माहितीनुसार जगातील ५२ देशांसाठी ६.६ मिलियन ग्लोव्ह्स , १.३ मिलियन सर्जिकल मास्क्स , ४ लाख २८ हजार एन ९५ मास्क , आणि ३४५०० कोव्हीड -१९ तपासणी किटची आवश्यकता पडणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा संसर्ग वाढणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!