#CrimeUpdate : घृणास्पद : कोरोना रुग्णाशी अश्लील चाळे , डॉक्टरच्या वेशातील नराधमांविरुद्ध गुन्हा….

सर्व जग , देश , राज्य आणि प्रत्येक शहरातील माणूस कोरोनासारख्या भयावह आजाराने त्रस्त आणि ग्रस्त असताना अशा काही बातम्या येतात ज्या लिहिणाराला लाज वाटते , वाचणाराला लाज वाटते , इतकेच नव्हे तर पोलिसांना सुद्धा लाज वाटते परंतु असे घाणेरडे लज्जास्पद कृत्य करणाऱ्या नराधमांना त्याचे काहीही वाटत नाही. असेच एक कृत्य मुंबई सेंट्रल येथील एका नामांकित रुग्णालयात घडले आहे. त्याचे झाले असे कि , या रुग्णालयातील एका विकृत डॉक्टरने कोरोनाबाधित रुग्णाशी अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद आणि किळसवाणा, निदनीय प्रकार केला असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णामुळे या डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याने या डॉक्टरला अटक करण्यात आली नसून त्याला सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या विषयी मटा ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे कि , वास्तविक पाहता मुंबई सेंट्रल येथील हे रुग्णालय काही डॉक्टर आणि कर्मचारी यांनाही कोरोना संसर्ग झाल्यामुळे सील करण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी या रुग्णालयातील सेवा पूर्ववत करण्यात आली. त्यानंतर ३० एप्रिल रोजी एक ४४ वर्षीय करोनाबाधित रुग्ण या रुग्णालयात भरती करण्यात आला. प्रकृती थोडी चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. दाखल करण्यात आल्याची दुसऱ्या दिवशी म्हणजे १ मे रोजी सकाळी एक ३५ वर्षीय डॉक्टर त्याला तपासण्यासाठी अतिदक्षता विभागात आला. तपासत असताना त्याने रुग्णाच्या अंगाचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. याबाबत रुग्णाने हटकल्यानंतर शांत झोपून राहण्यास या डॉक्टरने सांगितले. शरीराच्या सर्व भागांचे चुंबन घेतल्यानंतर तो लैंगिक चाळे करू लागला. रुग्णाने आक्षेप घेताच रुग्णावर डॉक्टर चिडला. दरम्यान काही वेळानंतर डॉक्टर हा घृणास्पद प्रकार करून बाहेर गेल्यानंतर पीडित रुग्णाने डॉक्टरने केलेला किळसवाणा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. रुग्णालय प्रशासनाने याबाबत शहानिशा केल्यानंतर या डॉक्टरविरुद्ध आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. करोनाची लागण झाली आहे हे माहीत असताना डॉक्टरने पीडित रुग्णासोबत लैंगिक चाळे केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.