AurangbadNewsUpdate : पुंडलिकनगरात गळफास घेऊन एकाची आत्महत्या

औरंंंगाबाद : गारखेडा परिसरातील पुंडलिकनगर येथे राहणा-या अशोक पांडूरंग जाधव (वय ५९) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली. अशोक जाधव यांनी घराच्या जिन्यात असलेल्या लोखंडी ग्रीलला नायलॉन दोरीने बांधुन गळफास घेतला होता. हा प्रकार कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी जाधव यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार हिंगे करीत आहेत.
नवजात अर्भक टाकून देणा-याविरूध्द गुन्हा दाखल
चिकलठाणा परिसरातील मोतीवाला नगरातील झाडीत नवजात अर्भक टाकून देणा-या निर्दयी व्यक्तीविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले स्त्री जातीचे नवजात अर्भक ३ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास मोतीवाला नगर येथे आढळून आले होते.