#MaharashtraCoronaUpdate : कोविड-१९ : जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील अपडेट माहिती एका क्लिकवर…

राज्यात सर्वत्र लॉकडाऊन चालू असतानाही कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या राज्यात ७ हजार ६२८ वर पोहचली आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे राज्यात आज एकाच दिवशी करोनाचे तब्बल ८११ नवीन रुग्ण आढळले असून आजवरचा २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा हा उच्चांक ठरला आहे. त्याचवेळी दिवसभरात करोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला असून या आजाराने आतापर्यंत ३२३ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचीही संख्या मोठी आहे. काल दिवसभरत ११९ रुग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत १०७६ रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज करोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात १३ मृत्यू मुंबईतील, ४ पुण्यातील तर पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, मालेगाव, धुळे आणि सोलापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत ३२३ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये १६ पुरुष आणि सहा महिला आहेत. यात ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे ११ रुग्ण, ४० ते ५९ वयोगटातील ८ रुग्ण आणि ४० वर्षाखालील तीन रुग्णांचा समावेश आहे. १३ मृतांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदान, ह्दयरोग असे अतिजोखिमीचे आजार आढळले आहेत.
दरम्यान राज्यात करोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. या चाचण्यांनी लाखाचा टप्पा ओलांडला आहे. आजपर्यंत १ लाख ८ हजार ९७२ नमुने प्रयोगशाळांत पाठवण्यात आले असून त्यातील १ लाख १ हजार १६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत तर ७ हजार ६२८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख २५ हजार ३९३ लोक होम क्वारंटाइनमध्ये तर ८ हजार १२४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या ५५५ कंटेंटमेंट झोन क्रियाशील असून, आज एकूण ८ हजार १९४ पथकांनी काम करुन ३१ लाख ४३ हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.